
हरारे,दि, १६ – कोर्टाच्या मनाईनंतरही झिम्बाब्वेचे पंतप्रधान मॉर्गन श्वागराई (६०) यांनी आपली प्रेयसी एलिझाबेथ मशेकाशी लग्न केले. ३५ वर्षीय एलिझाबेथ राष्ट्रपती रॉबर्ट मुगाबे यांच्या पक्षातील एका ज्येष्ठ नेत्याची मुलगी आहे. एका कार्यक्रमात त्यांनी एकमेकांना अंगठी घालून लग्नाची औपचारिकता पूर्ण केली. मात्र अद्यापही त्यांनी विवाह रजिस्टरमध्ये हस्ताक्षर करून कायदेशीर पूर्तता केलेली नाही. राष्ट्रपती मुगाबे लग्न सोहळयास उपस्थित नव्हते. मार्च २००९ मध्ये मॉर्गन यांची ३१ वर्षीय पत्नी सुसान एका कार अपघातात मरण पावली होती. त्यानंतर त्यांनी दुसरे लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.
