
औरंगाबाद: कन्नडचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार हर्षवर्धन जाधव यांच्यावर पोलिसांनी केलेले आरोप खुल्ताबाद न्यायालयाने फेटाळून लावले आहेत. त्यामुळे दिलासा मिळालेल्या जाधव यांनी पोलिसांविरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभागाकडून केला जावा; अशी मागणीही त्यांनी केली.
