मुंबई: अॅमस्टरडॅम ब्रिज जहाजावर लागलेली आग पूर्णपणे विझविण्यात अग्निशामक दल आणि तट रक्षक दलाला यश मिळाले आहे. तब्बल १४ तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझली.

मुंबई: अॅमस्टरडॅम ब्रिज जहाजावर लागलेली आग पूर्णपणे विझविण्यात अग्निशामक दल आणि तट रक्षक दलाला यश मिळाले आहे. तब्बल १४ तासाच्या अथक प्रयत्नानंतर ही आग विझली.
जामनगरहून कोलंबोला निघालेल्या या जहाजाला मुंबईजवळ समुद्रात रविवारी आग लागली. तटरक्षक दलाच्या जहाजांबरोबर समुद्र प्रहरी आणि सुभद्रा कुमारी या दोन व्यापारी जहाजांच्या मदतीने ही आग विझविण्यात आली.
आगीचे कारण अद्यापही समजू शकले नाही.