
मुंबई: भारत आणि पाकिस्तानचे संबंध सुरळीत करण्यासाठी क्रिकेट डिप्लोमसीचा अवलंब होणार असल्याची चर्चा आहे. त्यावेळी विक्रमवीर सचिन तेंडुलकर पाक संघाविरुद्ध मैदानात उतरेल; तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भूमिका काय असेल हे मला बघायचे आहे; अशा शब्दात विख्यात गायिका आशा भोसले यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
