नवी दिल्ली: वादग्रस्त पत्रकार नीरा राडीया यांचा सेलफोन टॅप करून ध्वनिमुद्रित केलेले संभाषण लिखित स्वरूपात दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आयकर विभागाला दिले.

नवी दिल्ली: वादग्रस्त पत्रकार नीरा राडीया यांचा सेलफोन टॅप करून ध्वनिमुद्रित केलेले संभाषण लिखित स्वरूपात दाखल करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने आयकर विभागाला दिले.
नीरा राडीया हिने मोठ्या प्रमाणावर बेहिशोबी माया जमविली असून तिचे परराष्ट्रातही कनेक्शन असल्याचा आरोप करून आयकर विभागाने तिचे २८०० फोन कॉल्स रेकॉर्ड केले आहेत. मात्र हे संभाषण न्यायालयात सादर होण्यापूर्वीच प्रसिद्धीमाध्यमांपर्यंत पोहोचल्याने वादग्रस्त ठरले आहे.
हे संभाषण प्रसिद्ध करण्यास माध्यमांना मनाई करावी; अशी मागणी करणारी याचिका ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे. या याचिकेची सुनावणी न्या. जी. एस. सिंघवी आणि न्या. एस. जे. मुखोपाध्याय यांच्या खंडपीठासमोर झाली.
यावेळी न्यायालयाने आयकर विभागाला ध्वनिमुद्रित संभाषण लिखित स्वरूपात दोन महिन्यात सादर करण्याचे आदेश दिले.