नवी दिल्ली: वाहन उद्योगातील १७ बड्या कंपन्यांनी आपल्या वाहनांचे सुटे भाग निर्धारित किमतीपेक्षा अधिक दराने विकल्याबद्दल कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने नोटीसा बजाविल्या आहेत.

नवी दिल्ली: वाहन उद्योगातील १७ बड्या कंपन्यांनी आपल्या वाहनांचे सुटे भाग निर्धारित किमतीपेक्षा अधिक दराने विकल्याबद्दल कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडियाने नोटीसा बजाविल्या आहेत.
या प्रकाराबाबत सीसीआयकडे मागील वर्षी तक्रारी दाखल झाल्या. सीसीआय च्या महासंचालकांनी या प्रकरणी चौकशी करून त्याचा अहवाल नुकताच सदर केला. या कंपन्यांनी आपल्या प्रतिष्ठीत नावाचा गैरफायदा घेऊन आपल्या गाड्यांचे सुटे भाग अधिक किमतीला विकल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आल्याचे या अहवालात नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे या कंपन्यांना करणे दाखवा नोटीस बजावली जाणार असून त्याचे उत्तर प्राप्त होताच पुढील कारवाईबाबत निर्णय घेतला जाईल; असे सीसीआयच्या सूत्रांनी सांगितले.
या कंपन्यांची नावे उघड करण्यास मात्र सीसीआयकडून नकार देण्यात आला.