देशात मध्यावधी निवडणुकीची शक्यता: नायडू

चेन्नई: कोट्यावधी रुपयांचे घोटाळे बाहेर येत असल्याने जनता कंटाळली असून देशात मध्यावधी निवडणुकांची शक्यता नाकारता येत नसल्याचे मत भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते व्यंकैय्या नायडू यांनी व्यक्त केले. सध्याच्या परिस्थितीत निवडणुका झाल्यास कॉंग्रेसला दारुण पराभवाला सामोरे जावे लागेल; असेही ते म्हणाले.

भ्रष्टाचार, महागाई आणि आर्थिक दुरवस्थेमुळे जनतेत असंतोष आहे. सत्ताधारी आघाडीबद्दल लोकांमध्ये असंतोष असून त्यांना धडा शिकविण्यासाठी लोक संधीची वाट बघत आहेत. वाढत्या भ्रष्टाचारामुळे काँग्रेसचा जनाधार घटत असून सद्यस्थितीत निवडणुका झाल्यास कॉंग्रेसचा मोठा पराभव होईल; असे मत नायडू यांनी व्यक्त केले.