रामदेवबाबांचे २ ऑक्टोबरपासून पुन्हा उपोषण

नवी दिल्ली: केंद्र सरकारच्या विरोधात योगगुरू रामदेव बाबा यांनी पुन्हा दंड थोपटले आहेत. आपण पुन्हा २ ऑक्टोबरपासून उपोषणाला बसणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.

कॉंग्रेसने आपल्याला अडचणीत आणण्याचे कितीही प्रयत्न केले तरी राजकीय व्यवस्थेत बदल घडवून आणण्यासाठी आपला लढा सुरूच राहील; असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. टीम अण्णाप्रमाणेच तुम्हीही राजकारणात जाणार का; असा प्रश्न केला असता रामदेव बाबा म्हणाले की; मला इतरांबरोबर तुलना करायची नाही. माझा संघर्ष सत्ता बदलण्यासाठी आहे आणि तो सुरूच राहणार.

कोळसा खाण घोटाळा प्रकरणी सरकारला सुवर्ण पदकच द्यायला हवे; असेही ते उपहासाने म्हणाले.