टॅक्स रिटर्नस् प्रिपेरर्स

taxमाहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रशिक्षणात आघाडीवर असलेल्या एनआयआयटी या संस्थेने आयकर खात्याशी सहकार्य करून एक नवा पण उपयुक्त अभ्यासक्रम सुरू करण्याचे ठरवले आहे. हा अभ्यासक्रम टॅक्स रिटर्न प्रिपेरर्स असा असून तो पूर्ण करणारे प्रशिक्षणाथीं लोकांना निरनिराळे टॅक्स रिटर्न भरून देण्यास मदत करतील. आयकर खात्याने टॅक्स रिटर्न प्रिपेअर्स या नावाने नवी योजना तयार केली असून तिच्याखाली हे प्रशिक्षण दिले जाणार आहे.

जनतेत आयकर विवरण पत्रे दाखल करण्याच्या कामाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी ही योजना आहे. कारण लोकांना या बाबत जाणीवही नाही आणि त्यांना असे विवरणपत्र भरावेसे वाटलेच तर त्यांना या संबंधातला फॉर्म भरता येत नाही. आता हे प्रशिक्षित आणि प्रमाणित लोक नागरिकांना याबाबत मार्गदर्शन करतील. एवढेच नाही तर त्यांचे विवरण पत्र स्वतःच कसलीही फी न घेता भरूनही देतील.

या प्रशिक्षणा साठी एनआयआयटी चे प्रशिक्षण संस्थांचे आणि त्यांच्या शाखांचे जाळे वापरले जाईल. एनआयआयटी च्या शाखा देशभरात ११० ठिकाणी आहेत. तिथे आता या अभ्यासक्रमात एकूण ५ हजार मुलांना प्रशिक्षण दिले जाईल. हे प्रशिक्षण घेण्यासाठी इच्छुक असलेल्यांना पदवी परीक्षा उत्तीण असावी लागेल. सर्टिफाईट टॅक्स रिटर्न प्रिपेरर्स म्हणून त्यांना मान्यता दिली जाईल. आयकर खाते या कामात गुंतलेले असल्यामुळे हे प्रमाणपत्र सरकारी मानले जाईल. ”

या नावाखाली विवरण पत्रे भरण्याचे सखोल शिक्षण दिले जाईल. विवरणपत्रां बाबत असलेले कायदे त्यांना समजावून सांगितले जातील. त्या प्रत्येकाला एक ओळखीचा नंबर दिला जाईल. १९६१ च्या आयकर कायद्याच्या अनुरोधाने हे नवे प्रशिक्षण दिले जाणार असून या लोकांनी स्वयंरोजगाराच्या धर्तीवर हे काम करावे अशी अपेक्षा राहणार आहे. कोणत्याही शाखेच्या पदवीधराला या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येईल. १५ दिवसांचे ऑन लाईन प्रशिक्षण आणि ११ दिवसांचे वर्गातले अध्यापन असे या अभ्यासक्रमाचे स्वरूप आहे. त्यात अनेक केस स्टडीज दाखवल्या जातील. वर्गाच्या शेवटी परीक्षा घेतली जाईल.

Leave a Comment