अजय देवगण आणि शाहरुख खान यांच्यातील दुश्मनी दिवसेनदिवस कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे. कोणी जर ‘सन ऑफ सरदार’ या सिनेमाला रिलीज होण्यापासून रोखणार असेल तर माझा ना इलाज आहे असे मत व्यक्त करून अजयने या वादातून माघार घेतली आहे.
अजयने घेतली शाहरुख पुढे माघार
यश चोप्रा दिग्दर्शित शाहरुखचा एक चित्रपट यावर्षी दिपवालीत रिलीज होत आहे. त्यामुळे शाहरुख खान व यश चोप्रा या दोघांनी मिळून देशातील प्रमुख डीस्ट्रीब्युटरशी चर्चा करून त्याच्या तीन सिनेमासाठी स्क्रीन बुक केले आहे. त्यामुळे ‘सन ऑफ सरदार’ या सिनेमाला स्क्रीन शिल्लक राहिले नाही. त्यामुळे अजयकडे आता कुठलाच ऑपशन शिल्लक राहिलेला नाही. त्यामुळे आता या वादातून माघार घेण्याचे त्याने ठरवले असल्याचे समजते.
याबाबत बोलताना अजय देवगण म्हणाला की, ‘ सन ऑफ सरदार सिनेमा रिलीज होऊ नये यासाठी काही मंडळी प्रयत्नशील असल्याने मी काहीच करू शकत नाही. त्यामुळेच या सिनेमाचे रिलीज डेट बदलण्याचा विचार करीत आहे. अजून काही ठरलेले नाही. मात्र तशास्वरूपाचा विचार सध्या करीत आहे.’
