आसामी नागरिकांवरील हल्ले थांबवा: उल्फा

गुवाहाटी: उर्वरित भारतात आसामी नागरिकांवर होणारे अत्याचार सुरूच राहिले तर आसामातील इतर भारतीय नागरिकांवर हल्ले केले जातील; असा इशारा उल्फा या दहशतवादी संघटनेने दिला.

भारतातील मुस्लीम गटांनी ईशान्य भारतीयांचा द्वेष करणे थांबवावे. अन्यथा त्यांना गंभीर परिणामांना सामोरे जावे लागे; असा इशारा उल्फाचा प्रमुख परेश बारुआ याच्या नावाने प्रसिद्ध करण्यात आलेल्या पत्रकात देण्यात आला आहे. देशाच्या काही भागात आसामींवर अत्याचार होत असून त्यात आतापर्यंत १४ आसामी युवकांची हत्या करण्यात आली आहे असा उल्फाचा आरोप आहे.

ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंट ही संघटना धार्मिक आणि वांशिक भेदभावाला प्रोत्साहन देत असल्याचा आरोपही उल्फाच्या पत्रकात करण्यात आला आहे.