
मुंबई: सागरी किनार्यावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या रडार आणि सेन्सर्सच्या यंत्रणेचे उद्घाटन संरक्षण मंत्री ए. के. अंथोनी यांच्याहस्ते शनिवारी करण्यात आले.

मुंबई: सागरी किनार्यावर डोळ्यात तेल घालून नजर ठेवण्यासाठी उभारण्यात आलेल्या रडार आणि सेन्सर्सच्या यंत्रणेचे उद्घाटन संरक्षण मंत्री ए. के. अंथोनी यांच्याहस्ते शनिवारी करण्यात आले.
कारगिलच्या युद्धानंतर देशातील सुरक्षा यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने स्थापन करण्यात आलेल्या मंत्रीगटाच्या शिफारशीनुसार पश्चिम किनारपट्टीवर टेहाळणीसाठी अत्याधुनिक यंत्रणा उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. सन १९९३चच्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील स्फोटके आणि २६/११ च्या हल्ल्यातील हल्लेखोर समुद्र मार्गानेच मुंबईत शिरल्याचे स्पष्ट झाल्याने किनारपट्टीच्या सुरक्षेचा प्रश्न अधिकच संवेदनशील बनला. त्यामुळे आता मुंबई आणि परिसरातील समुद्रावर लक्ष ठेवणारी आधुनिक रडार यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली.
या यंत्रणेतील रडारकेंद्र तारापूर, कोरलाई, टोळकेश्वर आणि देवगड या ठिकाणी उभारण्यात आली आहेत. ही यंत्रणा किनार्यापासून २५ नॉटीकल मैलाच्या अंतरापर्यंत हालचालींवर नजर ठेवणार आहे. या यंत्रणेकडून जमा झालेली माहिती तटरक्षक दलाच्या मुख्यालयात तत्काळ पोहोचणार आहे.
अशाच प्रकारची यंत्रणा अंदमान, मेनलँड आणि लक्षद्वीप येथेही कार्यान्वित करण्यात येणार आहे.