नवी दिल्ली: नक्षलवाद्यांच्या शस्त्रांची देखभाल दुरुस्ती करणाऱ्या पाच जणांवर कोलकात्याच्या राष्ट्रीय अन्वेषण संस्था विशेष न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आले. या आरोपींनी कोलकता आणि ठाण्यात नक्षलवाद्यांसाठी केंद्रीय तांत्रिक समिती स्थापन करून अनेक शस्त्रेही विकसित केली आहेत.
सदूला रामकृष्णन, दीप कुमार, सुकुमार मोंडाल, संभूचरण पाल आणि बापी मुदी अशी या आरोपींची नावे आहेत.
या आरोपींनी सदूला स्वागत कस्तुरी या बनवत संस्थेच्या नावाने नक्षलवादी चळवळीसाठी सन २००८ मध्ये कोलकाता आणि ठाण्यात तांत्रिक समिती स्थापन केली. या ठिकाणी कार्यशाळा उभारून त्यात शस्त्रांचे सुटे भाग आणि कच्चा माल बनविला जात असे. दीपक आणि सदूला यांनी मुंबई आणि कोलकात्यात स्थायिक होण्यासाठी कोत्या कागदपत्रांचा आधार घेतला.