मुंबई: छत्रपती शिवाजी टर्मिनस हिंसाचार प्रकरणी पोलीस आयुक्तांप्रमाणे गृहमंत्री आर. आर. पाटील हे देखील तितकेच दोषी आहेत. त्यामुळे आता आबांनीही राजीनामा द्यावा; अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा केली आहे.

मुंबईचे पोलीस आयुक्त अरूप पटनायक यांची उचलबांगडी केल्यामुळे आपल्या मनात विजयाची भावना निश्चितपणे नाही. त्यांच्याशी आपली वैयक्तिक दुष्मनी नाही. मात्र या घटनेपासून मंत्री आणि अधिकारी यांनी योग्य तो धडा घ्यावा; असे आवाहनही राज ठाकरे यांनी केले.
छत्रपती शिवाजी टर्मिनस हिंसाचार प्रकरणी ईद नंतर कारवाई करण्याच्या पोलिसांच्या भूमिकेचा निषेध करून ठाकरे यांनी आमच्या आंदोलकांवर कारवाई करताना पोलिसांनी दसरा, दिवाळी, गणपती अशा सणांचा विचार केला आहे काय; असा सवाल पोलिसांना केला. मनसेच्या मोर्चाचे शिवसेना भारतीय जनता पक्षाने समर्थन केल्याबद्दल समाधान व्यक्त करून ठाकरे म्हणाले की; सरकारच्या चुकीच्या भूमिकेबाबत राजकारण बाजूला ठेऊन अशाच प्रकारे सर्व बाजूंनी दबाव अआला पाहिजे. अन्यथा सरकारची मनमानी चुच राहील; असा इशाराही त्यांनी दिला.