लंडन,२१ ऑगस्ट-विकीलीक्सचे संस्थापक जुलियन असांज खूप दिवसानंतर सार्वजनिक ठिकाणी दिसून आले. लंडनमध्ये इक्वाडोर दूतावासाच्या बिल्डिंगच्या बालकनीतून बाहेर येऊन असांज यांनी अमेरिकेवर जोरदार हल्ला चढवला.

लंडन,२१ ऑगस्ट-विकीलीक्सचे संस्थापक जुलियन असांज खूप दिवसानंतर सार्वजनिक ठिकाणी दिसून आले. लंडनमध्ये इक्वाडोर दूतावासाच्या बिल्डिंगच्या बालकनीतून बाहेर येऊन असांज यांनी अमेरिकेवर जोरदार हल्ला चढवला.
इक्वाडोरच्या दूतावासात राजकीय आश्रय घेतलेल्या असांजने अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष बराक ओबामा सांगितले की, अमेरिकेने विकीलीक्सचा पाठपुरावा करणे बंद करावे.
अंसाजनुसार, मी राष्ट्रध्यक्ष ओबामांना योग्य चर्चेचे समर्थन करण्याची मागणी करतो. अमेरिकेने विकीलीक्सचा पाठपुरावा करणे बंद करावे.
जुलियन असांज म्हणाले की, विकीलीक्सच नाही तर संपूर्ण जगात भाषण स्वातंत्र्यास धोका आहे. असांज जूनमध्ये स्वीडनला पाठविण्याच्या भीतीने लंडनमध्ये इक्वाडोरच्या दूतावासात आश्रयास गेले होते.स्वीडनमध्ये त्यांची बलात्कारप्रकरणी चौकशी केली जाणार आहे, परंतु असांज हे आरोप फेटाळत आले आहेत.
इक्वाडोरने ऑस्ट*ेलियन मूळच्या ४१ वर्षीय असांजला ब्रिटेनच्या विरोधानंतर राजकीय आश्रय देण्याची घोषणा केली होती. इक्वाडोर एंबेंसीच्या बाहेर लंडन पोलिस, स्कॉटलंड यार्डचा कडक पहारा आहे.