केंद्रीय मंत्री विलासराव देशमुख यांच्या निधनामुळे त्यांचा मुलगा रितेश देशमुख सध्या दुखात आहे. रितेश हा सलमानचा चांगला मित्र आहे. त्यामुळेच देशमुख कुटुंबाच्या दुखात सहभागी होऊन यावर्षी सलमानने ईद साजरी न करण्याचा निर्णय घेतला आहे.

सलमान खानच्या घरी ईदच्या दिवशी त्याच्या नातेवाईकाची व मित्राची गर्दी होत असते. त्यासोबतच ईदच्या दिवशी सलमानची भेट व्हावी या उद्देशाने हजारो फॅन्स त्याच्या घरासमोर उभे असतात. यावेळेसही सलमानच्या कुटुंबाने ईदच्या पूर्वसंध्येला तयारी सुरु केली होती. त्यासाठी सलीम खान, हेलन, सलमा, आरबाज खान, मलाइक आरोरा, सोहेल खान, सीमा, निर्वाण, आर्यन, अतुल आदीजन तयारीला लागले होते.
सलमान खानने मात्र हा ईद साजरी न करण्याचे ठरविले आहे. याबाबत सलमान खान म्हणाला, ‘ माझा जवळचा मित्र असलेल्या रितेश देशमुखच्या वडिलाचे नुकतेच निधन झाले. त्यामुळे मी यावर्षी ईद साजरी न करण्यचा निर्णय घेतला आहे. फॅन्सची दरवर्षी ईदनिमीत्त मी एक चांगला सिनेमा त्यांना गिफ्ट द्यावा ही इच्छा असते. त्यांची इच्छा मी एक एटरटेनर म्हणून ‘एक था टायगर’ या चित्रपटाद्वारे पूर्ण केली आहे.’ २००९ पासून सलमानने वांटेड या सिनेमापासून त्याच्या फॅन्सना ईदी देण्याचे ठरविले आहे ती परंपरा यावर्षी ही कायम राखली आहे.