गाझियाबाद: सर्वच राजकीय पक्ष भ्रष्टाचाराची पाठराखण करीत असून सामान्य जनतेच्या कल्याणाऐवजी खाजगी कंपन्यांचे उखळ पांढरे करण्यातच त्यांना अधिक रस आहे; अशी टीका टीम अण्णाचे सदस्य अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.

शुक्रवारी संसदेत सादर करण्यात आलेल्या कॅगच्या अहवालात उघड झालेल्या कोळसा, वीज आणि विमानतळांच्या घोटाळयाबाबत बोलताना केजरीवाल म्हणाले की; नैसर्गिक साधनसंपत्तीची लूट करून सामान्य जनतेला नाडायचे आणि खाजगी उद्योगांच्या तुंबड्या भरायच्या हेच राजकीय पक्षांचे उद्योग आहेत.
कॅगसह सर्व घटनात्मक संस्था पंतप्रधानांच्या अधिपत्याखाली आहेत. मग या भ्रष्टाचाराला सरकारच पाठीशी घालणार असेल तर आम्ही दाद मागायची कुठे; असा सवाल करून केजरीवाल यांनी सक्षम लोकपालच्या मागणीचा पुनरुच्चार केला.