काही दिवसापूर्वी अमिषा पटेल ही बिग बी अमिताभ बच्चनची नवीन शेजारीन होणार असल्याची बातमी मीडियात वाऱ्यासारखी पसरली होती. अमिषाही आतापर्यंत सर्वाना बच्चन कुटुंबाच्या प्रतीक्षा बंगल्याजवळील एका अपार्टमेंटमध्ये ४००० स्क्वेयर फूटचा फ्लॅट खरेदी केल्याचे सांगत होती. मात्र याचा अमिषाला चांगलाच फटका बसला असून घरमालकाने हा फ्लॅट तिला ठरल्याप्रमाणे भाड्यानेही देण्यास नकार दर्शविला आहे.
तो फ्लॅट हा वालिया कुटुंबाच्या मालकीचा आहे. त्याने अमिषाला हा फ्लॅट काही दिवसापूर्वीच भाड्याने दिला होता. मात्र तिने सर्वत्र हा फ्लॅट घेतल्याची अफवा पसरविली. त्यामुळेच घरमालकाने अमिषाला हा फ्लॅट रेंटवर देण्यास ही नकार दर्शविला आहे.
वालिया कुटुंबाच्या सूत्राने सांगितले की, अमिषा सर्वाना फ्लॅट खरेदी केल्याचे सांगत असल्याने त्यांना पहिल्यांदा शॉकच बसला. ती कुणाची प्रॉपटी रेंटवर घेवून खरेदी केली आहे असे सांगत असेल तर ते चुकीचे आहे. अमिषाने फ्लॅटसाठी ५ लाख रुपये टोकन म्हणून दिले होते. त्यानंतर तिने फ्लॅटमध्ये रिनोव्हेशनचे काम सुरु केले होते. हे काम तीन आठवड्यापर्यंत सुरु होते. मात्र आमिषाची भूमिका पाहून वालिया कुटुंबाने फ्लॅट रेंटवर देण्यासही नकार दर्शविला आहे.