दिल्ली: देशाच्या संरक्षणाची महत्वपूर्ण जबाबदारी असलेल्या संरक्षण दलांनाही भ्रष्टाचाराची लागण असून ही देशासमोरील गंभीर समस्या आहे; अशा शब्दात संरक्षण मंत्री ए. के. अॅथोनी यांनी सेना दलांचे कान टोचले.
स्वातंत्र्यादिनाच्या पूर्वसंध्येला अँथोनी यांनी आकाशवाणीवरून सेनादलांना संबोधित केले.
कठोर परिश्रम, निष्ठा, क्षमता आणि शिस्त ही सेनादलांची ओळख आहे. ही ओळख कायम ठेवण्याकडे सेनादलातील प्रत्येकाने दक्ष राहिले पाहिजे; अशी अपेक्षा अँथोनी यांनी व्यक्त केली.
दहशतवाद ही देशासमोरील आणखी एक बिकट समस्या आहे. दहशतवाद संपविण्यासाठी सेनादलांनी काटेकोर राहणे आवश्यक आहे. मात्र हे काम करताना मानवी हक्कांची पायमल्ली होऊ देता कामा नये. तसे झाल्यास सेनादलांची प्रतिमा डागाळते आणि त्यांच्या अनेक चांगल्या कामांवर पाणी पडते; याची जाणीवही अँथोनी यांनी करून दिली.