सौदी अरबमध्ये महिलांसाठी वेगळ्या शहराची निर्मिती !

रियाध,दि.१३- इस्लामिक देश सौदी अरब आता महिलांसाठी एक वेगळ्या शहराची निर्मिती करण्याची योजना बनवत आहे. नोकरी करणार्या इच्छुक महिलांना या शहरात शरिया कायदे अंतर्गत काम करण्याची परवानगी राहील.

देशाच्या विकासात महिलांद्वारे सक्रिय भूमिका निभावण्याची सरकारच्या महत्वाकांक्षेअंतर्गत ही योजना तयार केली जात आहे. याचा उद्देश्य महिलांसाठी रोजगार निर्माण करण्याचे आहे. तसेच देशात महिलांच्या काम करण्यावर निर्बंध नाही; परंतु सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्या महिलांची आकडेवारी खुप कमी आहे.

सौदी इंडस्ट्रीयल प्रॉपर्टी अथॉर्टी (मोडोन) पश्चिम देशाच्या तर्कावर महिलांसाठी काही बदल करू इच्छित आहे. मोडोननुसार नवीन शहराच्या डिझाइनवर सध्या काम सुरू असून, याची निर्मिती आगामी वर्षापर्यंत सुरू होईल.

हफूफ राज्याच्या पूर्वी शहराच्या महानगरपालिकेला नवीन शहराच्या निर्मितीसाठी आठ कोटी ४० लाख पौंड (सुमारे ७.२ अब्ज रुपये) गुंतवणुकीची अपेक्षा आहे. यामुळे शहरात वस्त्र, औषध व खाद्य प्रसंस्करण उद्योगात पाच हजारपेक्षा जास्त नोकर्या निर्मित होतील. 

मोडनचे उपसरचिटणीस सालेह अल-रशीद यांच्या हवाल्याने अल-इक्तसादिया वृत्तपत्राने सांगितले, ’देशाच्या अनेक भागात फक्त महिलांसाठी उद्योगधंदे उघडण्याच्या योजनेवर काम केले जात आहे. या योजनेअंतर्गत जूनमध्ये विविध मॉल्समध्ये सेल्समन म्हणून विदेशी महिलांच्या जागी सौदी महिलांना ठेवणे सुरू करण्यात आले होते. या व्यतिरिक्त सौंदर्य प्रसाधन, परफ्यूम, अंतर्वस्त्राशी संबंधित दुकानावर पुरुष कर्मचार्यांवर निर्बंध लावण्यात आला आहे. यात आता महिलाच काम करतील.’ 

सौदी अरब जगातील पहिला असा देश आहे जेथे महिलांना कार चालवण्याची परवानगी आतापर्यंत नाही. गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात महिलांना मतदान व वर्ष २०१५ मध्ये स्थानिक निवडणुक लढवण्याचा हक्क देण्यात आला. 

Leave a Comment