बंगळुरु,दि. १० – भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) आपल्या पुढील मोहिमेची जय्यत तयारी करीत असून, ही इस्रोची शंभरावी मोहीम आहे. यामध्ये दोन विदेशी उपग्रहांचे व्यावसायिक प्रक्षेपण करण्यात येणार आहे. सप्टेंबरच्या दुसर्या आठवड्यात आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोट्टा येथील केंद्रातून या दोन्ही उपग्रहांचे प्रक्षेपण करण्यात येणार आहे.
इस्रोची शंभरावी मोहिम जय्यद तयारीत
’स्पॉट-६’ हा फ्रान्सचा ७२० किलोग्रॅम वजनाचा दूरस्थ संवेदन (रिमोट सेन्सिंग) उपग्रह ’ऍस्ट्रियम सास’ कंपनीने बनविला आहे. तसेच, ’प्रोटियर्स’ या जपानने स्वदेशी बनावटीत तयार केलेल्या अवकाश यानाचेही प्रक्षेपण करण्यात येणार आहे. हा इस्रोच्या वाटचालीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
’इस्रोने १९७५ मध्ये ’आर्यभट्ट उपग्रहाने सुरुवात केली. आम्ही आतापर्यंत ६२ उपग्रह आणि ३७ प्रक्षेपक यांसह एकूण ९९ मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत,’ असे इस्रोचे प्रमुख के. राधाकृष्णन यांनी सांगितले.
