चौकशीला सामोरे जाण्यास आसाराम बापूंची टाळाटाळ

अहमदाबाद: अध्यात्मिक गुरू आसाराम बापू यांच्या आश्रमात दोघा भावांचा संशयास्पदरित्या मृत्यू झाल्याप्रकरणी नियुक्त करण्यात आलेल्या आयोगासमोर जाणे आसाराम बापूंनी टाळले. मात्र आयोगाने बापूंना गुरुवारी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

शहरातील मोटेरा परिसरात आसाराम बापूंचा आश्रम आहे. या आश्रमाच्या गुरुकुलात अध्ययन करणारे दिपेश आणि अभिषेक वाघेला या दोघा भावांचा मृतदेह साबरमती काठाच्या परिसरात आढळून आला. हे दोघे सन २००८ पासून बेपत्ता होते. आश्रमात चालणार्‍या तंत्रविद्येच्या प्रकारात या भावांचा बळी देण्यात आल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.

या प्रकरणाची चौकशी निवृत्त न्यायाधीश डी. के.त्रिवेदी यांच्या नेतृत्वाखालील आयोग करीत आहे. आयोगाने आसाराम बापू आणि त्यांच्या मुलाला आतापर्यंत ४ वेळा समन्स जारी केले आहे. मात्र एकदाही आसाराम बापू आयोगासमोर आलेले नाहीत. वास्तविक बापू हजार राहण्यास तयार असल्याचे त्यांच्या वकिलाने मागच्या वर्षीच सांगितले होते.