विजेंद्र, मेरी कोम मारणार ‘मेडल पंच’ ?

ओलोपिंक स्पर्धेत आजचा सोमवारचा दिवस भारताच्या दृष्टीने महत्वपूर्ण मानाला जात आहे. बॉक्सिगमध्ये आज दोन पदके मिळण्याची शक्यता आहे. त्यासोबतच शुटींगमध्ये भारताला पदक मिळून देणारा गगन नारंग ५० मीटर शुटींग प्रकारात पुन्हा एक पदक मिळून देईल अशी अशा आहे.

विजेंद्र सिंह आणि मेर कोम हे पदका पासून एक पाऊल दूर आहेत. दोघाची आतापर्यतची कामगिरी पाहिली तर ते सेमिफायनालमध्ये प्रवेश करून पदक निश्चित करतील अशी अशा आहे. मेरी कोम पहिल्यांदाच ओलोपिंक स्पर्धेत सहभागी झाली आहे. ५१ किलो वजन गटातील क्वॉटर फायनलमध्ये तिची लढत ट्यूनिशियाच्या मैरेओ राहली सोबत होणार आहे. या सामन्यात मेरी कोम विजयी झाली तर तिचे ब्रांझ पदक निश्चित होणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार सायंकाळी ६ वाजता होणार आहे. तसे पाहता मेरी कोमकडून सुवर्ण पदकाची अपेक्षा केली जात आहे.

बिजींग येथील ओलोपिंक स्पर्धेत ब्रांझ पदक मिळवून देणारा विजेंद्र सिंग याचा मुकाबला उज्बेकीस्तानच्या अब्बास अतीव सोबत होणार आहे. विजेंद्रही पदकापासून एक पाऊल दूर आहे. त्याची लढत सोमवार मध्यरात्री २.३० च्या सुमारास होणार आहे.

१० मीटर शुटींगमध्ये ब्रांझ पदक मिळून देणारा गगन नारंग आज ५० मीटर शुटींगमध्ये नशीब अजमावणार आहे. क्वॉलिफाय व फायनल आजच असल्याने यामध्येही पदक मिळण्याची अशा आहे. त्यामुळेच भारतसाठी आजचा सोमवारचा दिवस महत्वपूर्ण मानला जात आहे.