नटखट जुही परतली

तब्बल दहा वर्षांनी आपली नटखट व अवखळ जुही बॉलीवूडमध्ये परतत आहे. सन ऑफ सरदार या चित्रपटातून ती पुन्हा एकदा विनोदी भूमिका साकारणार आहे. यापूर्वीही तिने अनेक चित्रपटातून विनोदी भूमिका साकारताना प्रेक्षकावर अधिराज्य गाजविले होते. तिच्या अभिनयाचा विसर आजही कुणाला पडलेला नाही.

उद्योगपती जय मेहता सोबत लग्न केल्यानंतर मधल्या काळात तिने बॉलीवूडपासून काही काळ अलिप्त राहणेच पसंत केले होते. दिग्दर्शक अश्विनी धीर सन ऑफ सरदारचे दिग्दर्शन करीत आहेत. या चित्रपटात ती पंजाबी युवती पम्मीची भूमिका साकारत आहे. तिचे लग्न या चित्रपटात संजय दत्तशी होणार असते मात्र हे लग्न काही कारणामुळे होत नाही, असे एकंदरीत या करमणूकप्रधान चित्रपटाचे कथानक आहे.

या भूमिकेबाबत जुहीची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता ती म्हणाली की, मला विनोदी चित्रपटात काम करण्यास नेहमीच आवडते मात्र अशा स्वरुपाच्या भूमिका मिळत नसल्याने मला नाईलाजास्तव गंभीर भूमिका असलेले चित्रपट स्वीकारावे लागले आहेत. आता मात्र मनासारखी भूमिका मिळाल्याचा आनंद आहे.