ईशान्य भारतात भूकंपाचे धक्के

शिलॉंग: ईशान्य भारतातील आसामसह काही राज्यांमध्ये रविवारी सकाळी भूकंपाचा धक्का बसला. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झाली नसल्याचे प्रशासकीय सूत्रांनी सांगितले.

रविवारी सकाळी ७ वाजून ५१ मिनिटांनी आसाम, मेघालय, मणिपूर, नागालेंड या राज्यांना भूकंपाचा धक्का बसला. प्रामुख्याने इटानगर, गुवाहाटी, आगरताळा आणि इंफाळ या शहरात भूकंपाचे धक्के अधिक प्रमाणात जाणवले. या भूकंपाची तीव्रता ६ रिश्टर स्केल एवढी नोंदविण्यात आली असून त्याचा केंद्रबिंदू म्यानमारपासून ७० किलोमीटर अंतरावर आहे.

जुलै महिन्याच्या सुरुवातीला नागालेंडमधील काही भागातही ५.५ रिश्टर स्केलचे धक्के जाणवले होते.