
लंडन: जुडो खेळाडू वोज्दानला ऑलिम्पिकच्या जुडो फेडरेशनने बुरखा किंवा स्कार्फ घालून खेळण्याची परवानगी नाकारली आहे.

लंडन: जुडो खेळाडू वोज्दानला ऑलिम्पिकच्या जुडो फेडरेशनने बुरखा किंवा स्कार्फ घालून खेळण्याची परवानगी नाकारली आहे.
सौदी अरेबियाची वोज्दान शहर्कानी ही पहिली महिला आहे जी ऑलिम्पिकमध्ये त्या देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे. ती जुडोच्या परंपरेनुसार व नियमांनुसारच बुरखा न घालता स्पर्धेत भाग घेईल; असे आंतरराष्ट्रीय जुडो फेडेरेशनचे अध्यक्ष मारिअस वाय्झेर यांनी स्पष्ट केले आहे. खेळादरम्यान महिला खेळाडू कुठल्याही प्रकारे डोके झाकणार नाहीत व पुरुषांबरोबर मिसळणार नाहीत यावर तिथले स्थानिक पालक लक्ष ठेवतील. पुरुष आणि स्त्रिया एकत्र खेळत नसले तरी लिंग हा स्पर्धेचा मुद्दा होऊ शकत नाही. दि. १ ऑगस्टपासून शहर्कानी पुरुषांबरोबरच स्पर्धेची तयारी व खेळाचा सराव करेल.
जुडो खेळताना बुरखा घातक ठरू शकतो. कारण जुडोच्या युनिफोर्मचे कापड व बुरख्याचे कापड सुळसुळीत वेगळे असते. खेळताना स्कार्फ ओढला जाऊ शकतो. ते घातक ठरू शकते.