
लंडन, दि.२७ – बीजिंग ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण जिंकणारा भारतीय नेमबाज अभिनव बिंद्राने सांगितले की, तो जुन्या आठवणीत राहण्याऐवजी लंडन ऑलिम्पिकमध्ये एक नव्याने सुरूवात करू इच्छित आहे. भुतकाळात पाहण्याचा काहीही अर्थ नसतो. मी स्वत:ला बीजिंगच्या आठवणीत बुडवू इच्छित नाही. मी चार वर्षापूर्वी दोन तासाच्या नेमबाजीत सुवर्ण पदक जिंकले होते.
