नवी दिल्ली: चीनबरोबर सहकार्याचे करार करतानाच त्याबाबत पूर्ण सावध राहून कोणत्याही क्षणी युद्धासाठी सज्ज राहावे; असा इशारा राष्ट्रीय सुरक्षाविषयक कृती समितीचे अध्यक्ष नरेश चंद्र यांनी दिला आहे. दक्षिण आशियाई देशात चीनचा वाढता दबाव आणि पाकिस्तानशी वाढणारी जवळीक चिंताजनक असल्याचेही त्यांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे.
देशातील सुरक्षेचा आढावा घेऊन कृती समितीने आपला अहवाल केंद्र शासनाला सादर केला आहे. या अहवालात सैनिकी कारवाई आणि गुप्तवार्ता यंत्रणा यांच्या समन्वयातून राष्ट्रीय सुरक्षेची व्यापक यंत्रणा कार्यान्वित करण्याची गरज व्यक्त करण्यात आली आहे.
चीन अरुणाचलमध्ये वारंवार घुसखोरी करीत असून त्यामुळे अनेकदा वादही उद्भवले आहेत. तरीही चीन अरुणाचल बाबत आपला दावा मागे घेण्यास तयार नाही. या प्रदेशात सुरू असलेल्या चीन लष्कराच्या हालचाली देशासाठी धोकादायक असून भारतीय नागरिकांना भडकविण्याचे प्रयत्नही चीनमार्फत केले जात आहेत; याकडे समितीने लक्ष वेधले आहे.
भारतीय राजदूतांच्या उपस्थितीत बीजिंगमध्ये नुकतेच एका लघुपटाचे प्रदर्शन करण्यात आले. या लघुपटात भारत आणि भारतीय लोकशाहीचा अवमान केल्याबद्दल भारताने चीनचा निषेध केला आहे