दीपिका पादुकोणचे सितारे सध्या फारच बुलंद आहेत. काही दिवसापूर्वी रिलीज झालेला कॉकटेल हा चित्रपट हिट झाल्याने सध्या ती खुशीत आहे. या चित्रपटतील तिची भूमिका प्रेक्षकांना चांगलीच पसंत पडली आहे. हे यश साजरे करण्यासाठी दीपिकाने बांद्रा येथील हॉट स्पॉटमध्ये पार्टीचे आयोजन करून जणू उत्सवच साजरा केला. या पार्टीमध्ये तिची मित्र मंडळी मोठ्या संख्येने सहभागी झाली होती.
या पार्टीत अभिनेता अर्जुन रामपाल पत्नी मेहरसोबत सहभागी झाला होता. सुज्जैन रोशन, डायना पेंटी, होमी अद्जनिया त्याची पत्नी अनिता, इम्तियाझ अली, सलीम-सुलेमान आणि प्रीतम यांनीही हजेरी लावली होती.मात्र चित्रपटातील हिरो सैफ अली खान या पार्टीला गैरहजर होता. सैफ सध्या रेस दोनच्या चित्रीकरणाच्या कामात व्यस्त असल्याकारणाने सहभागी झाला नसल्याचे समजते. या पार्टीत सहभागी झालेल्यानी कॉकटेलच्या गाण्यावर ठेका धरला होता. या पार्टीवेळीं दीपिका होस्टची भूमिका मनापासून करत होती.प्रत्येक पाहुणे मंडळीची ती स्वता होऊन विचारपूस करीत होती. एकंदरीत या पार्टीत सहभागीं झालेल्या प्रत्येकच्या चेहऱ्यावर आनंद ओसडून वाहत होता.