महिंद्रा झायलो नव्या सवलतींसह उपलब्ध

महिंद्रा आणि महिंद्राची एमयूव्ही झायलो गाडी आता ग्राहकांसाठी नव्या सवलतींसह उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापूर्वी या गाडीवर दोन वर्षांची वॉरंटी आणि पन्नास हजार किमी अशी योजना होती ती आता ३ वर्षे वॉरंटी आणि १ लाख किमी अशी करण्यात आली आहे. ही सवलत सर्व व्हेरियंटवर लागू करण्यात आली असून ती आजपासूनच नव्या खरेदीवर देण्यात येणार आहे.

महिद्राची झायलो ही भारतीय हवामान आणि भारतीय रस्त्यांसाठी योग्य वाहन आहे. टोयाटोच्या इनोव्हा आणि मारूतीब च्या एर्टिगा या दोन वाहनांच्या मधली ही गाडी असून सात सीटर मारूती उपलब्ध झाल्यापासून या क्षमतेतील अन्य वाहनांच्या विक्रीवर कांहीसा विपरित परिणाम झाला आहे. त्यामुळेच महिंद्रा ने झायलोसाठी अधिक आकर्षक ऑफर दिली असून त्यामुळे ग्राहक या गाडीकडे आकर्षित होतील अशी अपेक्षा कंपनी व्यवस्थापनाने व्यक्त केली आहे.
 
महिंद्रा त्यांची पाच सीटर झायलो येत्या दोन महिन्यांत लाँच करत आहेत. रेनाँच्या डस्टर आणि फोर्डच्या आगामी इकोस्पोर्ट या गाड्यांशी पाच सीटर झायलोला स्पर्धा करावी लागणार आहे.