एकदा आपण केलेली भूमिका जर प्रेक्षकांना मनापासून आवडली तर काय होते, याची प्रचीती नुकतीच अभिनेता असलेल्या अब्बास मेहताला आली. `इस प्यार को क्या नाम दू’ या चित्रपटात अब्बासने खलनायक असलेल्या श्यामचा रोल केला आहे. या चित्रपटात त्याने निगेटिव्ह रोल केल्याने त्यामुळे तो रिअल लाइफमध्ये विलन असेल, असा समज प्रेक्षकांनी करून घेतला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून फँन्सकडून मिळणाऱ्या वेगळ्या वागणुकीमुळे अब्बास परेशान आहे.
इमेजमुळे झाला अब्बास परेशान
याबाबत बोलताना अब्बास म्हणाला की, मला कोण भेटले तर पहिल्यांदा एक दोन मिनिट तो माझ्याकडे टक लावून पाहत असतो. त्यानंतर काहीजण तर काही वेळानंतर ओरडतात देखील असा एक दोन वेळा नव्हे, तर बरेचदा माझ्या बाबतीत घडले आहे. मी केवळ निगेटिव्ह रोल करतो म्हणून असे घडते. काही दिवसांपूर्वी माझा सहकारी वरुणचे अपहरण झाले होते, त्यावेळी ही मला बरेचसे नाराजी व्यक्त करणारे मेल आले होते.
मी पण अशा पद्धतीच्या नाराजीचा सामना करण्याची तयारी आता केली आहे. या चित्रपटातील माझी भूमिका सर्वाना पॉवरफुल वाटली असल्याने मला पण फँन्सकडून अशा प्रकारचे बोलणे ऐकल्यानंतर आता हसू येत असल्याचे ही अब्बासने म्हटले आहे.
