
नवी दिल्ली, दि. १८ – अखेर आपला आडमुठेपणा सोडून तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बेनर्जी यांनी संसदीय मंडळाच्या बैठकीत राष्ट्रपती पदासाठी युपीएचे उमेदवार प्रणवदांना पाठिंबा देण्याचे जाहीर केले. मात्र, हा निर्णय आपल्याला अतिशय दु:खद अंत:कारणाने घ्यावा लागत असल्याची पुस्तीही त्यांनी जोडली आहे.
