वॉशिंग्टन, दि. १८ – अंतराळातून पृथ्वीकडे पाहणे हा नितांत सुंदर अनुभव आहे; अशा भावना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचलेल्या भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांनी अंतराळातून आपल्या बहिणीशी बोलताना व्यक्त केल्या.

विल्यम्स यांच्यासह रशियाचे कमांडर युरी मलेनचेनको आणि जपान एरोस्पेस एक्प्लोरेशन, एजन्सीचे फ़्लाईट अभियंता अकीहीको होशिदे हे अंतराळवीर, दोन दिवसांचा अंतराळ प्रवास करून भारतीय प्रमाण वेळेनुसार मंगळवारी सकाळी १० वाजून २१ मिनिटानी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर सुखरूप दाखल झाले. त्यानंतर त्यांनी नासाचे अधिकारी, कुटुंबीय आणि पत्रकार यांच्याशी संवाद साधला.
सध्या अंतराळात सहा अंतराळवीर असून त्यापैकी अकाबा, पडलाका आणि रेवीन हे १७ सप्टेंबर रोजी पृथ्वीवर परतणार आहेत. विल्यम्स आणि त्यांचे सहकारी दोन स्पेस वॉकसह अनेक शास्रीय प्रयोग करणार आहेत.