मुंबई, दि. १७ – माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना वेग नियंत्रक बसविण्याच्या प्रश्नावरून राज्याचे परिवहन विभागाबरोबर वाहतूकदार संघटनेची चर्चा फिसकटल्याने दि. १७ च्या मध्यरात्री पासून बेमुदत संपावर जाण्याच्या निर्णयावर वाहतूकदार ठाम आहेत.

महामार्गावर आणि शहरातील रस्त्यांवर सातत्याने वाढणारे अपघातांचे प्रमाण कमी करण्याच्या दृष्टीने माल वाहतूक करणाऱ्या वाहनांना वेग नियंत्रक बसविणे राज्य शासनाने अनिवार्य केले आहे. मात्र, या सक्तीमुळे माल वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वेगावर नियंत्रण येऊन वाहतूक व्यावसायिकांचे नुकसान होईल. प्रामुख्याने नाशिवंत मालाची वाहतूक कारणे मुश्कील होईल; असे वाहतूकदार संघटनेचे म्हणणे आहे.
इतर कोणत्याही राज्यात अशा प्रकारची सक्ती नसताना महाराष्ट्रातच का; असा सवाल माल वाहतूकदार महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांनी केला. मात्र, याबाबत शासनाने अध्यादेश जारी केला असून, न्यायालयाने त्याला अनुमती दिली आहे; अशी भूमिका परिवहन विभागाचे प्रधान सचिव एस. के.शर्मा यांनी घेतली. त्यामुळे ही चर्चा फिसकटली आहे.