माल्याच्या आयपीएल संघाचे दिवाळे

 नवी दिल्ली, दि. १५ – कर्जात बुडालेले उद्योगपती विजय माल्या इंडियन प्रीमियर लीगमधला आपला संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या खेळाडूंना त्यांची फीसदेखील देऊ शकत नाही. माल्याची किंगफिशर एयरलाइन्स देखील आर्थिक संकटाशी संघर्ष करीत आहे. कंपनी गळ्यापर्यंत कर्जात बुडालेली आहे. वृत्तानुसार कर्ज भरणे व खेळाडूंना त्यांची फीस देण्यासाठी माल्या आपला आयपीएल संघ विकु शकतात.

त्यांचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने करारबद्ध काही मुख्य खेळाडूंना आयपीएल-४ मध्ये खेळण्यासाठी त्यांच्या फीसचा पहिला टप्पादेखील मिळालेला नाही. फीससाठी प्रतिक्षा करीत असलेल्या खेळाडूंमध्ये संघाचा कर्णधार डेनियल वेटोरीसहित भारतीय व विदेशी स्टारचा समावेश आहे. या खेळाडूंना त्यांच्या फीसविषयी आतापर्यंत कोणतेही आश्‍वासनही देण्यात आले नाही. माल्यावर एकुण ७,५०० कोटी रुपयाचे कर्ज आहे ज्याला भरण्यासाठी ते आपला संघ विकू शकतात.

तसेच ही पहिली घटना आहे जेव्हा आरसीबीचे मालक विजय माल्या आपल्या खेळाडूंना वेळेवर पैसे देऊ शकले नाही. उल्लेखनीय आहे विजय माल्याची एअरलाइंस कंपनी किंगफिशर एअरलाइन्स तोट्यात चालत आहे. ज्याची भरपाई आरसीबी खेळाडूंना भोगावी लागत आहे. आयपीएल करारनुसार १ एप्रिलपर्यंत खेळाडूंना फीसमधील १५ टक्के मिळायला हवे होते.

मेमध्ये १.५० टक्के, १.२० टक्के टी-२० नंतर आणि अंतिम २० टक्के डिसेंबरपर्यंत मिळायला हवे. परंतु पैसे न मिळाल्यामुळे खेळाडू खूप दु:खी आहेत.

खेळाडूंचा आरोप आहे की,  संघ मालकांनी फीसवर त्यांना अंधारात ठेवले. खेळाडूंनी संघाचे प्रशिक्षक रे जेनिंग यांना पत्रही लिहले आहे. खेळाडूंना फ्रेंचाइजच्या स्थितीवर आणखी स्पष्टीकरण हवे आहे. तसेच खेळाडूंचे म्हणणे आहे की, मालकाची समस्येची त्यांना जाणीव आहे. परंतु त्यांना याविषयी सांगितेल असते तर चांगले राहिले असते.