
जम्मु/नवी दिल्ली,दि. १२ – जम्मू-काश्मिरमधील पुंछ जिल्ह्यात एका पाकिस्तानी सैनिकाला अटक करण्यात आली आहे. या सैनिकाचे म्हणणे आहे की, पाकिस्तान कंगाल झाला आहे. त्यामुळे भारताने त्याला आश्रय द्यावा. पोलिसांनी या सैनिकाकडून १३ हजार रुपये, दोन सीम कार्ड, सिव्हील आय कार्ड आणि रजेचे प्रमाणपत्र जप्त केले. या सैनिकाचे नाव आरिफ अली असून, तो पाकिस्तानी सैन्याच्या २५ व्या फ्रंटियर फोर्सचा जवान आहे. १९ वर्षांच्या आरिफला भारतीय सैनिकांनी जेव्हा अटक केली, तेव्हा तो साध्या कपड्यात होता. तसेच त्याच्याजवळ कोणतेही शस्त्र सापडले नाही.
