मुंबई, दि.११ – एसटी महामंडळात येत्या काही दिवसांत तब्बल २० हजार कर्मचार्यांची भरती केली जाणार आहे. आठवडाभरात या भरतीसंदर्भात जाहिरात काढण्यात येणार असून, वर्षाअखेरपर्यंत टप्प्या-टप्प्याने सर्व जागा भरण्यात येणार आहे.

एसटी महामंडळात सध्या कर्मचार्यांचा तुटवडा आहे. गेल्या दोन वर्षापासून एसटीत भरतीच करण्यात आलेली नाही. एसटीत सध्या चालकांचा सर्वाधिक तुटवडा आहे. त्याबरोबरच वाहक , लिपिक, मॅकॅनिक यांच्याही जागा भरल्या जाणार आहेत. जून-जुलैमध्य निवृत्ती झालेल्या कर्मचार्यांचे प्रमाण जास्त आहे. वर्षाअखेरपर्यंत याची संख्या अधिक वाढेल. त्यामुळे सध्याच्या कर्मचार्यांवर कामाचा ताण येऊ नये, यासाठी भरती केली जाणार असल्याचे एसटी महामंडळाकडून सांगण्यात आले.
गेल्या वर्षभरात नव्या वातानुकूलित, साध्या बसेस उपलब्ध करण्यात आल्या आहेत. काही बसेसची बांधणी सुरू आहे. प्रवाशांना आकर्षित करून घेण्यासाठी विविध उपक्रम राबवण्यात आले असून, ते यशस्वीही ठरले आहेत. एसटीची शहरी वाहतूक ही आगामी योजना आहे. या सर्वाचा विचार करून प्रथम भरतीप्रक्रिया राबवण्याकडे महामंडळाचा कल आहे.