
पुणे, दि. ७ – राज्यात ‘गोहत्या’ बंदी कायदा करावा, या मागणीसाठी मातृभूमी दक्षता समितीच्या वतीने बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्त्वाखाली देहू येथील तुकाराम महाराज वैकुंठ गमन मंदिरासमोर ११ जुलैपासून बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.

पुणे, दि. ७ – राज्यात ‘गोहत्या’ बंदी कायदा करावा, या मागणीसाठी मातृभूमी दक्षता समितीच्या वतीने बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्त्वाखाली देहू येथील तुकाराम महाराज वैकुंठ गमन मंदिरासमोर ११ जुलैपासून बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.
याविषयी चळवळीचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार परिषदेत म्हणाले, हिंदू धर्मात गायीला पवित्र मानले जाते. कृषी, पर्यावरण आणि मानवी जीवनाशी गायीचा संबंध आहे. मात्र, मागील अनेक वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात गायींच्या कत्तली करण्यात येत. गायींच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. अशा पद्धतीने गायींच्या कत्तली होत राहिल्यास गायींचे अस्तित्व संपायलाही वेळ लागणार नाही.
यासाठी आताच पावले उचलण्याची गरज आहे. राज्यात कार्यरत असलेल्या ३०० वैध आणि अनेक अवैध कत्तलखान्यात रोज हजारो गायींची कत्तल होत आहे. वास्तविक पाहता आजारी, रोगाने ग्रासलेल्या गायींना कापण्यासच कायद्याने परवानगी दिली आहे. मात्र, व्यापारी फायद्यासाठी गायींना अपंग करून त्यांना कत्तलखान्यात पाठविण्यासाठी आवश्यक असलेले प्रमाणपत्र मिळवतात. याबाबत राज्य शासनाला एक निवेदन देण्यात आले असून, राज्य शासन या प्रश्नावर गंभीर नसल्याचे निदर्शनास येत आहे. यासाठी बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे.
गोहत्या रोखण्यासाठी महात्मा गांधी तंटामुक्त समितीच्या धर्तीवर ‘पूज्य विनोबा भावे’ समिती शासनाने स्थापन करावी, कृषी उत्पन्न समितीच्या माध्यमातून जनावरांच्या कत्तलीसाठी होणार्या खरेदी-विक्रीवर निर्बंध घालावेत आणि यावर नियंत्रण ठेवण्यासाठी तालुकानिहाय दक्षता समिती नेमावी, अवैध कत्तलखान्यांवर त्वरित कडक कारवाई करावी, कत्तलखान्यातील जनावरांच्या मांसाच्या निर्यातीवर बंदी आणावी. जनावरांचा चार्याचा प्रश्न शासनाने सोडवावा आणि गोहत्या रोखण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशा मागण्याही शेख यांनी यावेळी केल्या. सचिव नरेंद्र पवार आणि भागवत बुचटे आदी यावेळी उपस्थित होते.
मुस्लिमांचा गोहत्येला विरोधच – मुबारक शेख
मुस्लिमांमधील १ टक्के व्यापार्यांना त्यांच्या स्वार्थासाठी गोहत्या बंदी होऊ नये, असे वाटते. मात्र, संपूर्ण मुस्लिम समाजाचा गोहत्या बंदीस विरोध आहे. अनेक इमाम, मुल्ला आणि मोलवींनी आंदोलनाला पाठिंबा दिला असून, त्यांच्यासह मुस्लिम बांधवही मोठ्या प्रमाणात यामध्ये सहभागी होणार असल्याचे मुबारक शेख यांनी सांगितले.