तंदुरी चिकन न मिळाल्यामुळे कुकची हत्या

मुंबई, दि. ६ –  रेस्टॉरंटमध्ये भोजन वाढण्यात उशिर केल्यावर राग तर खूप येतो; परंतु इतका नव्हे की, कुणाचा जीव घेतला जावा. भुकेमुळे मृत्यु झाल्याच्या अनेक घटना समोर येतात परंतु भुकेने हत्या करण्याची ही पहिली घटना आहे.

मुंबईमधील मुलुंडच्या इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर आनंद ढाब्यावर बीएमसीच्या ४ चालकांना तंदूरी चिकन वाढण्यात उशिर झाल्यामुळे इतका राग आला की, त्याने कुकला निदर्यीपणे मारणे सुरू केले. नंतर कुकने रूग्णालयात प्राण सोडला. हे चौघे मुलंडमधील जमा केलेला कचरा फेकण्यासाठी आले होते. पोलिस उप-महानिरीक्षक यांनी सांगितले की, आपले काम पूर्ण केल्यनांतर हे लोक आनंद ढाब्यावर भोजन करण्यासाठी पोहचले. जेथे यांनी तंदूरी चिकन व ८ रोटीची ऑडर दिली. भोजनाची ऑर्डर दिल्यानंतर चौघे चालक तेथून गेले आणि थोड्या वेळानंतर परतल्यावर त्यांनी भोजन वाढवण्यास सांगितले, तेव्हा भोजन तयार नव्हते.

ढाब्याचा मालक उदय शेट्टीने त्यांना १० मिनीट आणखी थांबण्यास सांगितले, याबाबीवर ते पुन्हा परत गेले. थोड्या आणखी उशिरानंतर परतल्यावर या लोकांना भोजन तयार मिळाले नाही, यावर रागवलेले चौघे चालक ढाब्याच्या मालकाशी वाद करू लागले आणि ढाब्याच्या मालकावर हात उचलला. शेट्टीच्या मदतीसाठी ढाब्याचा कुक करन सिंह पुढे आला, तर एक चालकाने त्यावर लाकडाच्या फळीने हल्ला केला. ज्यामुळे करन सिंहच्या डोक्यातून रक्त वाहू लागले आणि तो बेशुद्ध झाला.

करन सिंहला त्वरित मुलुंड जनरल रूग्णालयात नेण्यात आले, त्यानंतर त्याला रजवाडी रूग्णालयात दाखल करण्यात आले आणि आखेर सिओन रूग्णालयात नेले गेले जेथे त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या चारही हल्लेखोरांना ताब्यात घेतले आहे.