
नवी दिल्ली,दि.५ – नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय गुन्हेगारी अहवालानुसार, विधवा, घटस्फोटीत महिलांत आत्महत्येचे प्रमाण हे विवाहित महिलांच्या प्रमाणापेक्षा कित्येक पटीने कमी आहे.

नवी दिल्ली,दि.५ – नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय गुन्हेगारी अहवालानुसार, विधवा, घटस्फोटीत महिलांत आत्महत्येचे प्रमाण हे विवाहित महिलांच्या प्रमाणापेक्षा कित्येक पटीने कमी आहे.
या अहवालात हे दिसून येते की, देशात आत्महत्या करणार्या महिलांचे प्रमाणामध्ये विवाहित महिलांचा समावेश मोठ्या प्रमाणावर आहे. तर पतीपासून विभक्त झालेल्या महिला मात्र, फारच कमी वेळा आत्महत्येचा मार्ग स्विकारतात. महिलांच्या विविध प्रश्नांवर काम करणार्या एका संस्थेच्या म्हणण्यानुसार, पतीपासून विभक्त झाल्यानंतर महिला दुःखी झालेल्या असतात, पण या दुःखापेक्षा या महिलांमध्ये जबाबदारीची भावना जास्त असते. त्यामुळे त्या क्वचितच आत्महत्येकडे वळताना दिसतात. २०१०-२०११ या अहवालात ही गोष्ट ठळक दिसून येते.
महिला हक्कांवर काम करणार्या रंजना कुमारी म्हणतात, ’काडीमोड झाल्यानंतर महिलांना सर्वात जास्त काळजी असते ती आपल्या मुलांची. निराश होऊन त्यांनी आत्महत्येचा मार्ग स्विकारला तर त्यांच्या मुलांचे काय होणार हा प्रश्न त्यांना सर्वात जास्त सतावतो. त्यामुळेच त्या आत्महत्या करण्यापूर्वी तीनदा तरी विचार करतात आणि सरते शेवटी जबाबदारीची जाणीव होऊन कणखर बनून आत्महत्येपासून परावृत्त होतात. अर्थात हे कमी असेल तरीही अजून ते ३१.४ टक्के एवढे आहे.
विवाहित महिलांमधील आत्महत्येचे प्रमाण होते ६८.२ टक्के तर विवाहित पुरुषांच्या आत्महत्येचे प्रमाण आहे तब्बल ७१ टक्के. बर्याचदा लग्नानंतर आपसुकच येणार्या आर्थिक जबाबदार्या पेलण्यात पुरुष कमी पडतात. त्यामुळे समाजाकडून अवहेलना स्विकारण्याऐवजी ते आत्महत्येचा मार्ग स्विकारतात.
एनसीआरबी अहवालानुसार, २०११ मध्ये एकूण एक लाख पस्तीस हजार लोकांनी आत्महत्या केली आहे. म्हणजेच हे प्रमाण तासाला १६ जण असे आहे. आत्महत्यांचे प्रमाण पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या राज्यांत सर्वाधिक आहे. यामध्ये पश्चिम बंगालने सर्वात वरचे स्थान पटकावले आहे.