सध्या गेल्या काही दिवसापासून छोट्या पडद्यावरील मालिकांमधून वेगळाच ट्रेंड आलेला पहावयास मिळत आहे. आता प्रत्येक मालिकेतील प्रमुख रोल करणारी अभिनेत्री थोडीशी सावळी असल्याचे जाणवयाला लागले आहे. त्यामुळे पूर्वीसारखे गोरे चेहरे आता मालिकांमधून कमी प्रमाणात पाहवयास मिळत आहेत.
एक काळ असा होता की, छोट्या पडद्यावर गोऱ्या असलेल्या अभिनेत्रीला खूप डिमांड होता पण आता बहुतेक दिग्दर्शकाची ही चाईस बदललेली दिसत आहे. सध्या या मालिकेच्या स्क्रिप्टप्रमाणे या मध्ये बदल करण्यात येत असल्याचे समजते. सावळ्या अभिनेत्री असलेल्या मलिकाना आता पूर्वीच्या तुलनेत किती तरी पट चांगला टीआरपी मिळत चालला आहे.
अफसर बिटिया मधील मिताली नाग, बालिका वधू मधील प्रत्युष बनर्जी, फिर सुबह होगी मधील गुल्की जोशी, पुनर्विवाह मधील कृतिका सेंगर, दिया और बाती मधील दीपिका सिंह आणि एक हजोरो में मेरी बहना मधील निया शर्मा सध्या छोट्या पडदा आपल्या आभिनयाने गाजवत आहेत. त्यामुळेच सध्या प्रोडक्शन हाऊसमधे सावळ्या अभिनेत्री दिसून येत आहेत. हा नवा ट्रेंड किती दिवस अधिराज्य गाजवितो हे पाहावे लागणार आहे.