एकता व सचिन यार्दीमध्ये तू तू मै मैं

‘मला जे वाटते तेच व्हायला हवे’, हा काही चित्रपटाचा डॉयलॉग नाही तर याच शब्दात एकता कपूरने ‘क्या सुपर कुल है हम’ या चित्रपटाच्या दिग्दर्शक असलेल्या सचिन यार्दीला सुनावले. यापूर्वीही या चित्रपटातील काही सीन वरून एकता व सचिन यांच्यात वादावादी झाली होती. मात्र आताच्या प्रकरणावरून दोघातील वाद  विकोपाला गेले आहेत.

दोघा मधील हा वाद एका सीनवरून झाला आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार सचिनने एकताला न सांगताच चित्रपटात एक सीन वाढविला आहे. एकताने हा सीन बघितला तेंव्हा तो हटविण्यास सांगितले. त्यामुळे सचिन व एकता मध्ये वादावादी झाली. या सीन मध्ये तुषार कपूर व रितेश देशमुख यांच्यात आजकालच्या नायिकांची  नावे कशी आहेत; कुणाचे नाव पेंटी तर कुणाचे फाखरी असा सीन या चित्रपटात घुसडला होता.

त्यावरून एकताने सचिनला सांगितले की, “कुणाच्या नावावरून विनाकारण वाद निर्माण होऊ नये अशी माझी इच्छा आहे. मी या चित्रपटची निर्मिती करत असल्याने मला या चित्रपटात काय हवे आहे काही नको ते मला समजते.”  मात्र सचिनने; “मी चित्रपटाचा दिग्दर्शक असल्याने मला कळते चित्रपटात काय हवे आहे आणि काय नाही अशा शब्दात एकताला सुनावले. त्यामुळे दोघातील वाद वाढतच गेला. त्यामुळे आता या चित्रपटात हा सीन राहतो की वगळण्यात येतो यावरूनच निर्माता श्रेष्ठ की दिग्दर्शक हे समजून येईल