
नवी दिल्ली दि.३-जबीउद्दीन अन्सारी उर्फ अबू जिंदाल याने भारतीय सुरक्षा संस्थांकडे चौकशीदरम्यान दिलेल्या माहितीत त्यांची नाशिक पोलिस अॅकॅडमीवर हल्ला करण्याची योजना होती असे मंगळवारी कबूल केले आहे. लाहोर येथील पोलिस अॅकॅडमीवर २००९ साली जसा हल्ला केला तसाच हल्ला नाशिक पोलिस अॅकॅडमीवरही करण्यात येणार होता आणि या हल्ल्यासाठी लष्करे तैयबाचा बाबा रेहमान शेख मार्गदर्शन करणार होता असे अबूने चौकशीत सांगितले आहे.
