हृतिकला आलाय राग

हृतिक रोशनची प्रतिमा बॉलीवूड मध्ये तशी पाहता शांत स्वभावाचा माणूस म्हणूनच  आहे, मात्र गेल्या काही दिवसापासून तो भलताच रागात दिसत आहे. क्रिश ३ या चित्रपटाचा शेवट त्याला हवा असलेल्या पद्धतीने होत नसल्याचे कारण या रागामागे आहे.

काही दिवसापूर्वी या चित्रपटाचा शेवट फरहान अख्तरच्या दिग्दर्शनाखाली त्याला पूर्ण करायचा  होता. यापूर्वीचे चित्रीकरण दिग्दर्शक टोनी चिंग यांनी पूर्ण केले  आहे. टोनी सध्या चित्रीकरणाचे काम पूर्ण करून विदेशात निघून गेला आहे. मात्र क्रिश चित्रपटाचा शेवट हृतिकला हवा असलेल्या पद्धतीने झाला नसल्याने सध्या तो तणावात आहे. अशा पद्धतीने जर चित्रपटाचा शेवट झाला तर  प्रेक्षक चित्रपट स्वीकारणार नाहीत असे त्याला वाटते. त्यामुळे त्याने शेवट बदलायचा ठरवले आहे. मात्र त्याला  ही गोष्ट जर दिग्दर्शक टोनी चिंगला समजली  तर त्याची प्रतिक्रिया काय असेल याची भीतीही वाटते आहे. या चित्रपटसाठी त्याने खूप मेहनत घेतली आहे.

सध्या या चित्रपटात बदल घडवून आणायची जबाबदारी दिग्दर्शक प्रभूदेवाकडे सोपविण्याचा ह्रितिकचा  विचार आहे. याबाबत तो लवकरच प्रभू देवाची भेट घेणार आहे.