अमृतसर,२ जुलै-पाकिस्तानच्या तुरुंगात सुमारे ३१ वर्षे घालविलेले सुरजित सिंग पाकिस्तानाच्या तावडीतून सुटले असले, तरी त्यांची न्यायालयीन लढाई अद्याप संपुष्टात आलेली नाही. लष्कराचा गुप्तहेर असल्याचे सिद्ध करण्यासाठी मी न्यायालयात जाणार आहे, असे त्यांनी सांगितले आहे.
सुरजित यांचा भाऊ, बाहिणी आणि मुलाचा मृत्यू झाला असल्याचे त्यांना तुरुंगातून सुटल्यानंतर समजले. अद्याप अनेक कुटुंबीय हयात आहेत. तर, काही मित्र त्यांच्या स्मरणशक्तिची परीक्षा घेत आहेत. पत्नी हरबंस कौर आपल्या पतीसाठी त्यांच्या आवडीचे पदार्थ बनविण्यात मग्न आहे. अनेक प्रकारचे संघर्ष करून हरबंस यांनी आपल्या कुटुंबाला सावरले आहे.
त्यांच्या मते, भलेही सुरजित यांना तुरुंगात चांगली वागणूक मिळाली असेल. मात्र, आपल्या सरकारला सुरजितसिंग यांची किंमत नाही. सुरजित गुप्तहेर नसल्याचे सरकारने सांगितले असेल, तरी आम्ही ते सिद्ध करून दाखविणार आहोत. देशाची सीमा कुणी विनाकारण पार करत नाही. मला लष्कराकडून पाठविण्यात आल्यानेच मी तेथे गेलो होतो, असे सुरजित यांनी सांगितले.