अनुष्का टाळतेय मिडीयाला

सलदोन हिट चित्रपट देणारी अनुष्का शर्मा सध्या फिल्मी पाटर्या, समारंभांमध्ये सहभागी होताना दिसत नाही. आयफा अवॉर्डस्मध्येही तिच्या प्रसंशकांना तिची झलक मिळाली नाही. सध्या यापासून दूर राहून आपल्या कामामध्ये तिने मन रमवल्याचे काहींचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे अनुष्काने मीडियापासूनही अंतर ठेवले आहे. तिच्या आणि रणवीर सिंहच्या नात्याबद्दल काहीही विचारू नका, असे ती बर्याचदा म्हणत असते. दुसरीकडे तिच्या वजनामुळेही तिने सध्या पाटर्यांपासून लांब राहणेच पसंत केले आहे.

काही दिवसांपूर्वी एका फोटोग्राफरने तिचे काही फोटो काढले होते. त्यात ती बरीच बारीक दिसत होती. वर्तमानपत्रात याच अनुषंगाने बातमीही छापून आली. त्यांनतर ती जेव्हा अशा पाटर्यांमध्ये सहभागी होई, तेव्हा सर्व लोक तिला तिच्या वजनाबाबतच प्रश्‍न विचारत. त्यामुळे अनुष्का चिडली. यापुढे अशा पाटर्यांमध्ये न जाण्याचा आणि मीडियापासून लांबच राहण्याचा निर्णय तिने घेतला. जाणकारांना मात्र तिचे हे वागणे आश्‍चर्यचकित करते. प्रचार-प्रसाराच्या या युगात अनुष्काचे असे वागणे तिच्या करिअरला घातक ठरू शकते, असे त्यांचे म्हणणे आहे.