
आपल्या देशात ऍनॅलिस्ट हे करीयर फारच दुर्लक्षित राहिलेले आहे. मोठी विसंगती अशी की, या करीयरची गरज वाढत असतानाही ते उपेक्षित राहिलेले आहे. उद्योग व्यवसायाच्या अनेक क्षेत्रात ऍनॅलिस्टांची गरज असते. बिझीनेस ऍनॅलिस्ट, डेटा ऍनॅलिस्ट, सिस्टीम ऍनॅलिस्ट, प्रोडक्ट ऍनॅलिस्ट अशी अनेक क्षेत्रे आहेत. बिझीनेस सिस्टिम ऍनॅलिस्ट हे फारच उज्वल करीयर आहे. कारण हा ऍनॅलिस्ट विविध संस्थांतल्या संगणक प्रणालींच्या वापराचे विश्लेषण करीत असतो.
