
चित्रपट माध्यम हे समाजमनाचे प्रतिबिंब असते. बदलत्या अर्थकारणाबरोबरच सामाजिक नीतीमूल्ये बदलत जातात. गुरु-शिष्यांचे नाते हे अतिशय पवित्र नाते आहे. मात्र, आज संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचे व्यावसायीकरण घडले आहे, यातुन जीवनाची मूल्ये बदलली आहेत, याचा परिणाम म्हणून वास्तववादी, सामान्य माणसाचे जगण मांडणार्या चित्रपटाच्या तुलनेने `दबंग’, `राउडी राठौड’सारखे मसाला चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरतात, असे मत चित्रपट दिग्दर्शक प्रकाश झा यांनी व्यक्त केले.
