नवी दिल्ली दि.२७- शीतपेय उत्पादनातील अग्रणी कंपनी असलेल्या कोकाकोलाने भारतात २०२० सालापर्यंत तब्बल पाच अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करणार असल्याचे जाहीर केले आहे. भारतीय रूपयात या गुंतवणुकीचे मूल्य २८ हजार कोटी रूपये असल्याचे सांगण्यात आले आहे.

कोकाकोलाच्या भारतीय युनिटचे अध्यक्ष व मुख्य कार्यकारी अधिकारी केंट याविषयी अधिक माहिती देताना म्हणाले की, भारत ही आमच्यासाठी महत्त्वाची बाजारपेठ आहे. म्हणूनच येथे २०२० पर्यंत बॉटलिंग क्षमतेत वाढ, नवीन बॉटलिंग प्रकल्प, विपणन बळकट करणे यासारख्या सोयीसुविधांसाठी पाच अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्याच वर्षी कंपनीने पाच वर्षांसाठी दोन अब्ज डॉलर्स गुंतविण्याची घोषणा केली आहे. ही नवी गुंतवणूक त्यापेक्षा तीन अब्ज डॉलर्सने अधिक आहे.
सध्या कंपनीचे भारतात ५६ प्रकल्प असून त्यापैकी २१ फ्रँचाईजी तत्त्वावरचे आहेत. कोका कोलाने जगभरात ज्या देशांत गुंतवणूक केली आहे त्यात भारत सातव्या क्रमांकावर असल्याचेही केंट यांनी यावेळी बोलताना सांगितले.