तहानलेल्या पुण्याला लवासाचे पाणी !

पुणे दि. २७ – पुणेकरांच्या घरात आता लवासाचे पाणी येणार आहे. पुण्याला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमध्ये खडखडाट झाल्याने, पाटबंधारे खात्याने या सूचना दिल्या आहेत असे खात्रीलायक वृत्त आहे. वरसगाव धरणाच्या क्षेत्रात दासवे आणि गडले बंधारे आहेत. यातल्या दासवे बंधार्‍यात पाणी आहे.

लवासाने अडवलेल्या या पाण्याचा वापर आता पुणेकरांच्या पिण्याच्या पाण्यासाठी केला जाईल. या पाण्यामुळे पुणेकरांची किमान दोन दिवसांची तहान भागणार आहे. या निर्णयाची अधिकृत घोषणा आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार करणार आहेत.

पानशेत, वरसगाव, खडकवासला, टेमघर या धरणांमध्ये पावसाने ओढ दिल्याने पाणीसाठा संपला आहे.त्यामुळेच आता पुणेकरांची तहान लवासा भागवणार आहे.